Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजू झनके यांना "समाजभूषण" पुरस्कार जाहीर




मुंबई (प्रतिनिधी)- प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड व महाराष्ट्र भास्कर व्यायामशाळा व क्रीडा मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा "समाज भूषण 2025" राज्यस्तरीय पुरस्कार यंदा मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार तसेच एक वही ,एक पेन अभियानचे प्रणेते राजू झनके यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ५०० हून अधिक नामांकन प्रस्ताव प्राप्त झाले होते. विविध सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची शहानिशा करून झनके यांची निवड करण्यात आली आहे. समाजसेवा, जनकल्याण व सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.हा राज्यस्तरीय गौरव सोहळा १५ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज मंगल कार्यालय,या ठिकाणी पार पडणार असून, या कार्यक्रमास राज्यातील मान्यवर साहित्यिक, सामाजिक नेते, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.झनके यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.विविध सामाजिक संस्थांनीही त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे.पुरस्कारप्राप्त राजूभाई झनके यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, या गौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.