Type Here to Get Search Results !

स्पा सेंटरमध्ये छापा टाकताना पोलिसांना धक्काबुक्की तिघांविरुद्ध फौंजदार चावडीत गुन्हे दाखल




सोलापूर  (प्रतिनिधी ) विजयपूर रोडवरील

एका स्पाच्या सेंटर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पाच-सहा दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी छापा टाकला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अशा बाबींकडे अधिक लक्ष दिले जात आहे. मंगळवारी (ता. २७) मध्यरात्री चार ते साडेचारच्या दरम्यान नवी पेठेतील सलगर कॉम्प्लेक्समधील इरा स्पा सेंटरची पाहणी करायला फौजदार चावडी पोलिस गेले होते. त्यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण चुंगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक व पोलिस ठाण्याचे अंमलदार सोमवारी 


नवीपेठ परिसरात रात्रगस्त घालत होते. त्यावेळी सलगर कॉम्प्लेक्समधील चौथ्या मजल्यावरील इरा स्पा दुकानात पोलिस पाहणीसाठी गेले. त्यावेळी सुलेमान रफिक शेख, हर्षल अमोल हजारे व एका अल्पवयीन मुलाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सुलेमान याने शर्टला धरून ओढले आणि बटण तोडले. डाव्या हातातील अंगठ्याजवळ चावा घेऊन सरकारी कामात अडथळा आणला, असेही फिर्यादीत नमूद आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सुरू झालेला हा प्रकार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होता. पोलिसांना तिघांनाही ताब्यात घेतले होते. त्यांना जामीन देऊन नोटिशीवर सोडण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत पाटोळे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.