सोलापूर (प्रतिनिधी ) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार दि.31 मे 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता पुणे रेल्वे स्थानक येथून शताब्दी एक्सप्रेसने सोलापूरकडे प्रयाण, सकाळी 09.00 वाजता सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ, कस्तुरबा नगर, सोलापूरकडे प्रयाण, सकाळी 9.15 वाजता श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ येथे आगमन व राखीव, सकाळी 9.45 वाजता आमदार सुभाष देशमुख यांच्या निवास्थानी आगमन व राखीव, सकाळी 11.00 वाजता आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे उपस्थिती, दुपारी 2.30 वाजता आमदार देवेंद्र कोठे यांचे निवासस्थानी आगमन व राखीव, दुपारी 3.00 वाजता दैनिक दिव्य मराठी आयोजित एज्युकेशन एक्सपो सोहळ्यास सदिच्छा भेट स्थळ- फडकुले सभागृह, सिध्देश्वर मंदिर जवळ, सोलापूर, दुपारी 3.30 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबीरास भेट स्थळ- हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर, दुपारी 4.00 वाजता सेवा प्रकल्प बैठकीस शासकीय विश्रामगृह, सात रस्ता सोलापूर येथे उपस्थिती, सायंकाळी 5.30 वाजता भाजपा शहराध्यक्ष सौ.रोहिणी तडवळकर यांचे निवासस्थानी आगमन व राखीव, सायंकाळी 6.45 वाजता वाहनाने सोलापूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, सायंकाळी 7.15 वाजता रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव, सायंकाळी 7.32 वाजता सोलापूर रेल्वे स्थानक येथून शताब्दी एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण करतील.
