सोलापूर (प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर कुंभारी परिसरात नवीन विडी घरकुल "क" विभागात अमन चौक ते 85 पॉइंट रिक्षा स्टॉप पर्यंत सध्या रोडची अशी परिस्थिती आहे की, पूर्ण रोड खड्डेमय झालेली आहे. रोडवर खड्डे आहे की, खड्यात रोड असा चित्र त्या टिकाणी निर्माण झालेला आह. त्या ठिकाणी गरीब कामगार वर्ग मोल-मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करीत आहे. तेथील रहिवाशांची अशी परिस्थिती आहे की, ते आपल्या घरांचा टॅक्स कुंभारीच्या ग्रामपंचायत मध्ये भरत आहे. परंतू त्या ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी कुटलाही लक्ष नाही शासन नागरीकांकडून टॅक्स तर वसुल करत आहे, परंतू त्यांच्या मुलभूत सुविधापासून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या रोडवर एक गाडी समोरुन आली तर दुसरी गाडी जागेवरच उभा राहायची परिस्थिती तेथे निर्माण झालेली आहे. कारण खड्डे एवढे झालेल आहे की, कुटल्याही बाईक टु व्हीलर, थ्री व्हीलर व अनेक गाडयाना त्या रोडवर जात असताना आपला जीव धोक्यात घालून त्या रोडवर जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
त्या रोडची आपल्या कार्यालया मार्फत पाहणी करुन तात्काळ दक्षिण सोलापूर कुंभारी परिसर येथे नवीन विडी घरकूल "क" विभागात अमन चोक ते 85 पॉईंट रिक्षा स्टॉप पर्यंत तात्काळ डांबरी रोड करण्यात करा म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकरी अधिकाऱी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले
