Type Here to Get Search Results !

गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लस* (HPV - सर्व्हयकल कॅन्सर व्हॅक्सिन)




पूर्वी कर्करोग ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषध अत्याधुनिक यंत्रतंत्रज्ञान नसल्यामुळे कर्करोग म्हटलं की मृत्यू असा समज होता परंतु मागील काही वर्षा पासून कर्करोगावरील उपचार पद्धतीत प्रचंड मोठी क्रांती झाली असल्यामुळे कर्करोगग्रस बाधितांचे जीव वाचत आहे.


परंतु कर्करोगाला प्रतिबंध उपाय योजना करून रोखता येत नसले तरी महिला, मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला होण्याआधीच रोखता येण्यासाठी लस उपलब्ध आहेत.


9 ते 26 वर्ष वयोगट अथवा 26 वर्षावरील महिलांनाही ही लस देऊन संभाव्य कर्करोगाला (कॅन्सरला) होण्याआधीच बचाव करता येऊ शकतो. तरी प्रत्येक महिलांना संबंधित HPV लस घेऊन संभाव्य कर्करोगाच्या (कॅन्सरच्या) धोक्यापासून मुलींनी आपला बचाव करावा. गर्भाशयाच्या कॅन्सरच्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या माहितीसाठी सोलापूर शहर व आसपासच्या परिसरात अनेक शाळा व महाविद्यालयाचे मुली, महिलांना माहिती दिली जाते. तरीही या विषयाबाबत समाजामध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे.

 

प्रत्येक ८ मिनिटाला 1 महिला सर्वाइकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे ) मृत्युमुखी पडते 15 वर्षावरील सुमारे 3 पैकी 1 पुरुष एच. आय.व्ही. ने संक्रमित आहेत. जवळजवळ सर्व सर्व्हयकल कॅन्सरची प्रकरणे एच.आय.व्ही. शी संबंधित आहेत.


गर्भाशयाचा कॅन्सर हा भारतातील कर्करोग ग्रस्त महिलांमध्ये दुसरा क्रमांकाचे कारण आहे आणि जगभरातील महिलांमध्ये तो चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. 30 वर्षावरील महिलांमध्ये तो सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. दररोज सुमारे 200 महिलांचा गर्भाशयाच्या कॅन्सर मुळे मृत्यू होतो. आणि भारतात सुमारे 1.24 लाख प्रकरणे निदान केले जातात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणाद्वारे सर्व्हयकल कॅन्सरला आळा घालता येऊ शकतो. नुकतीच अनावरण केलेली स्वदेशी एच.पी.व्ही. लस आता परवडणाऱ्या परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध झाली आहे. 


फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने ज्वेलेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आर्थिक सहकार्याने 9 ते 14 वयोगटातील मुलींना ही लस मोफत उपलब्ध केली आहे. या अल्पमुदतीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून माहे ऑगस्ट 2025 पूर्वी पर्यंत वय वर्षे 9 ते 14 मधील 150 किशोरवयीन मुलींना ही लस देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. 


*ज्या पालकांना आपल्या किशोरवयीन मुलींना ही लस द्यावयाची आहे त्यांनी मुलींची नावे सम्राट चौक, सोलापूर येथील चिडगुपकर हॉस्पिटल मध्ये ही नोंद करावीत. तसेच फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे शाखाधिकारी, सुगतरत्न गायकवाड मो. नंबर 9011907001, कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी मो. नंबर 9860670715, परिचारिका आशालता मस्के मो. नं. 9922960672, परिचारिका रोजमेरी गायकवाड मो. नं. 9545991842 यांच्याकडे नावे नोंदवावीत. 


*ही लस चिडगुपकर हॉस्पिटल व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या जोडबसवण्णा चौक, बुधवार बाजार, जन्नत कॉम्प्लेक्स समोरील पद्मावती क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत*


*ही HPV - लस सर्व गरीब, वंचित, उपेक्षित, सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित घटक, एस.सी. एस.टी. कम्युनिटी व सामान्य नागरिकांच्या पाल्यांना मिळण्यासाठी शासनाने आपल्या आर्थिक व आरोग्य धोरणात याचा समावेश करावा व हि लस उपलब्ध करून द्यावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत. HPV लस शासनाने उपलब्ध करून द्यावी यासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व संशोधन केंद्र, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक , सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्याचे काम सुरू आहे*


*डॉ. मीनल चिडगुपकर*

*स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रतज्ञ*

 *एफ. पी. ए. आय. सोलापूर, मेडिकल सब कमिटी मेंबर, सोलापूर*

*मो. नं. 9890838884*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.