Type Here to Get Search Results !

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या भव्य मिरवणुकीचा परवाना रात्री १२:०० वाजेपर्यंत वाढवून देणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम




 सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात दरवर्षी १ ऑगस्टपासून साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आठवडाभर उत्साहात साजरी केली जाते. सन १९९४ पासून सुरू झालेला हा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक प्रबोधनाचा उपक्रम मागील ३० वर्षांपासून समाजात भरीव योगदान देत आहे.

या उत्सवाची सांगता दरवर्षी त्या आठवड्यातील रविवारी भव्य मिरवणुकीच्या संचलनाने केली जाते. सुमारे ६० मंडळे आकर्षक देखाव्यांसह या मिरवणुकीत भाग घेतात. परंतु पोलीस प्रशासनाकडून दरवर्षी मिरवणुकीसाठी रात्री १०:०० वाजेपर्यंतच परवानगी दिली जाते. त्यामुळे वेळेअभावी अनेक मंडळांना मिरवणूक अपूर्ण ठेवावी लागते.

    सकल मातंग समाज, महाराष्ट्र राज्य, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, सोलापूर व क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना आणि इतर  संघटनांकडून   वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे परवाना रात्री १२:०० वाजेपर्यंत वाढवण्याची विनंती केली होती. मात्र त्याची योग्य दखल घेतली जात नव्हती.

  मंडळांना संपूर्ण वेळ मिळावा यासाठी मिरवणूक  परवाना रात्री १२:०० वाजेपर्यंत वाढवून देण्याबाबतचे निवेदन  आज सकल मातंग समाज, महाराष्ट्र राज्य व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, सोलापूर यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी मध्यवर्ती चे संस्थापक,माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, सकल मातंग समाजाचे  राज्य समन्वयक सुरेश पाटोळे, शिवसेना नेते लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, टि. एस. क्षीरसागर सर, किशोर जाधव सर, रोहित खिलारे, यांची प्रमुख उपस्थिती होती,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.