Type Here to Get Search Results !

आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी फारूक मटके सर यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट, विविध राजकीय विषयावर केली चर्चा.



सोलापूर (प्रतिनिधी ) विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. इद्रिस नाईकवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठकीसाठी  आले असता 


अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस फारूक मटके सर यांच्या निवासस्थानी  सदिच्छा भेट दिली. फारूक मटके मित्र परिवार वतीने आमदार ईद्रीस नाईकवाडी यांचा  शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार  करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके यांच्या निवास स्थानी राष्ट्रवादी पक्ष संघटना व इतर  महत्वाच्या विषयावर  विचार विनिमय करण्यात आला आमदार ईद्रीस नाईकवाडी यांच्या सोबत  प्रदेश कार्याध्यक्ष मुबिन सिद्दिकी, प्रसिध्दी प्रमुख ताहीर मिर्जा बेग व सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.