संकलन : सकलेश (अण्णा) बाबुळगावकर सोलापुर
युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युध्द सुरु झाल्या नंतर नागरिकांनी काय काळजी घ्यायची आहे?
सरकारी यंत्रणांनी काय करायचं आहे?
याचा अभ्यास सराव म्हणजे मॉक ड्रील
यात धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य रुपांतर केलं जातं
आपत्कालिनक परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतील हे पाहिलं जातं
मॉक ड्रिल दरम्यान कुठेतरी आग लागली*,
दहशतवादी हल्ला झाला
किंवा
भूकंप झाल्याचं वातावरण निर्माण केलं जातं
लोकांना अशा परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढणं आणि मदतकार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाते.
सध्याच्या परिस्थितीत आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास आधीच तयार असणं आवश्यक आहे
मॉक ड्रिलच्या माध्यमातून याची पडताळणी केली जाते.
धोक्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य कसे वागतात?
*सुरक्षा कर्मचारी आणि बचाव टीम किती तत्परतेने प्रतिक्रिया देतात?* *सुरक्षा उपकरण आणि अलर्ट प्रणाली योग्य पद्धतीने काम करीत आहेत की नाही?*
*याची पडताळणी केली जाते*.
तसेच, कोणत्या गोष्टी मध्ये सुधारणेची गरज आहे हे देखील पाहिलं जाते
मॉक ड्रिल साठी ठरलेल्या वेळेनुसार सायरन वाजवला जातो किंवा इशारा दिला जातो
लोकांना परिस्थिती विषयी सूचना दिल्या जातात
मॉक ड्रीलच्या ठिकाणी असलेल्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जातं
फायर ब्रिगेड*, *एन.डी.आर.एफ*, *पोलीस आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचतात.
*सर्व प्रक्रियेचं मूल्यांकन केलं जातं*.
सगळ्या गोष्टींना किती वेळ लागला
*काय कमतरता होती*
आणि
कशात सुधारणेला वाव आहे
*हे सर्व पाहिलं जातं*.
सद्यस्थितीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवली
तर त्याचा सराव आधीच झालेला असणं आवश्यक आहे
मॉक ड्रीलच्या माध्यमातून याची पडताळणी करता येते..
