Type Here to Get Search Results !

महापालिका काबीज करण्यासाठी बेभान होऊन काम करा आमदार प्रवीण स्वामी -शिवसेना ठाकरे पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांचे शिबीर उत्साहात




सोलापूर (प्रतिनिधी)  महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेनेचे कायमच आकर्षण राहिले आहे. सत्तेत असताना मनोहर जोशीसारख्या मुख्यमंत्र्यांच्या काळात दिल्लीच्याही तख्ताला झुकावे लागले होते. त्यामुळे आगामी काळात महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी बेभान होऊन शिवसैनिकांनी काम करावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केले.


येथील शिवस्मारक सभागृहात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, राज्य संघटक उद्धव कदम, महाराष्ट्राचे आरोग्य सेवा कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, मॅनेजमेंट एक्स्पर्ट डॉ. राजशेखर येळीकर, दत्तात्रय मेनकुदळे, नीलेश पोगूल, जिल्हाप्रमुख संतोष पाटील, प्रा. अजय दासरी, उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, नाना मोरे आदी उपस्थित होते.


ठाकरे यांचा विचार पोहोचवावा. लोकांचा विश्वास संपादन करावा. वरिष्ठांना सन्मान द्यायला शिका, असे सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये एकदिलाने काम करून शिवसेनेची ताकद वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पदाधिकाऱ्यांना.



सोशल मीडियाचा वापर कसा करावा, महापालिका निवडणुकीतील आव्हाने कशी पेलावीत, निवडणुकीची तयारी, उमेदवार निवड याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. अजय दासरी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.