Type Here to Get Search Results !

मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाच्या वतीने "शिक्षणाचा जागर" विद्यार्थी पालक मेळावा.



सोलापूर (प्रतिनिधी ) मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा वतीने डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज, वस्ताद लहुजी साळवे, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,डॉ साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ॲड विक्रम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व लहुवंदना घेण्यात आली यावेळी कार्याध्यक्ष संजय भोंडवे, मुख्यसंघटक योगेश बोराडे , सरचिटणीस, निताताई खुडे , महाराष्ट उपाध्यक्ष मीनाक्षीताई पेठे, यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 


सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैय्या धडे कार्यवाहक श्रीकांत बोराडे, समन्वयक गिरीधर थोरात, जिल्हाअध्यक्ष करुणा झुंजारे, उपाध्यक्ष अवधूत आडकर , चिटणीस किशोर जाधव, शहर अध्यक्ष अनिल उकरंडे , उपाध्यक्ष शशिकांत उकरंडे तसेच या कार्यक्रमाला सुनील क्षीरसागर व्यवस्थापक, राजशेखर शिंदे महाउद्योग अधिकारी, युवराज मोरे MSEB अधिकारी, शेखर वाघमारे अनअकॅडमी, अल्ताफ शेख खादी ग्रामोद्योग, यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, यावेळी सोलापूर जिल्हातून मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षीताई पेठे यांनी केले तर आभार आदर्श भैय्या धडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.