Type Here to Get Search Results !

लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी संकलन : सकलेश (अण्णा) बाबुळगावकर सोलापुर

 



सोफिया कुरेशी यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरात मधील वडोदरा शहरात झाला.


ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत त्यांनी भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व केले.

त्या भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल या पदावर सेवेत असून 

सध्या सिग्नल कोर या विभागात सेवा देतात.


भारतीय सैन्यदलातील त्या अशा पहिल्या महिला अधिकारी आहेत 

ज्यांनी सैन्यदलाच्या 'एक्सरसाईज फोर्स १८' या प्रशिक्षण मोहिमेचं नेतृत्त्वं केलं 

दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या संघांचा या मोहिमेत सहभाग होता


कर्नल कुरेशी मुळच्या गुजरातच्या रहिवासी असून

त्यांनी बायोकेमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले 

पण शिक्षणाचे क्षेत्र सोडून त्यांनी देशसेवेचा मार्ग निवडला 


शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत त्या १९९९ पासून भारतीय सैन्यदलात सहभागी झाल्या.


त्यावेळी त्यांचं वय अवघे १७ वर्षे इतकं होतं


याच वर्षी त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण केले 

आणि 

लेफ्टनंट म्हणून सैन्यात प्रवेश मिळवला.

२००६ मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहीमे अंतर्गत काँगो मध्ये लष्करी निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

अशांत प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या आव्हानात्मक कार्यात त्यांनी त्यांनी आपले कौशल्य आणि धैर्य दाखवले.

ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. 

*लष्करी सेवेचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला असून*, *त्यांचे आजोबाही सैन्याच्या सेवेत होते*. 

*त्यांचे पती मॅकेनाईज्ड इन्फेंट्री मध्ये आर्मी ऑफिसर आहेत*. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.