Type Here to Get Search Results !

वरकुटे (करमाळा) येथील श्री स्वामी समर्थ मंदीराचे महेश इंगळे यांच्या हस्ते शुभारंभ




सोलापूर (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील वरकुटे या गावी निर्मिती करण्यात आलेल्या नुतन श्री स्वामी समर्थ मंदीराचे शुभारंभ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. समर्थक चॅरिटेबल ट्रस्ट वरकुटे मार्फत ट्रस्टचे अध्यक्ष योगेश देशमुख यांच्या मातोश्री सुलभा बबन देशमुख यांच्या इच्छेनुसार त्यांच्या स्वखर्चाने या श्री स्वामी समर्थ मंदीराची उभारणी करण्यात आल्याची माहिती महेश इंगळे यांनी दिली. या मंगल क्षण प्रसंगी महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार पहाटे पासूनच प्राणप्रतिष्ठापना महाअभिषेक, यज्ञकुंड होम, आरती, महानैवेद्य इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता महेश इंगळे यांच्या हस्ते फित कापून मंदीराचे शुभारंभ करून मंदीर भाविकांकरीता दर्शनार्थ खुले करण्यात आले. यावेळी महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष योगेश देशमुख व त्यांच्या मातोश्री सुलभा देशमुख व कुटूंबियांच्या प्रमुख उपस्थितीत महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महाआरती व नैवेद्य आरती संपन्न झाली. या नंतर संस्थेच्या वतीने उपस्थित भाविकांना भोजन महाप्रसाद वाटप करण्यात आले



.

महाआरती नंतर महेश इंगळे तसेच श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे मा.सभापती संपतराव उर्फ भारत शिंदे

व सर्व प्रमुख पाहुण्यांचा समर्थक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष योगेश देशमुख, सुलभा बबन देशमुख, मंदिर उभारणी करण्यास परिश्रम घेतलेले स्वप्निल पाटील, किरण पाटील, बबनरावजी देशमुख, योगेश देशमुख, सोनाली देशमुख, स्वप्निल पाटील किरण पाटील, हरिचंद्र राजगुरू, संतोष शिरसागर कीर्ती क्षीरसागर, राजेंद्र सोहनी, स्वाती सोहनी, वरकुटे गावचे सरपंच दादासाहेब भांडवलकर, कीर्तनकार संतोषजी अभंगराव पंढरपूरकर, अनिल लांडगे, शिल्पा लांडगे, अक्कलकोट महेश इंगळे मित्र परिवारचे बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, प्रा.शिवशरण अचलेर, सुनिल पवार, चंद्रकांत सोनटक्के, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ मुसळे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.