Type Here to Get Search Results !

सोलापूर जिल्ह्यात गुटखा माफीयांचा हैदोस सुरूच पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका अन्न औषध विभागाची सांगोल्यात कारवाई




सांगोला (प्रतिनिधी ) पुणे दक्षता विभाग व सोलापूर

अन्न व औषध - प्रशासनाच्या पथकाने अवैधरीत्या गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकानात व गोदामावर धाड टाकून चारचाकी वाहनासह ४ लाख ५३० रुपयांचागुटखाजप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी न दिलेल्या फिर्यादीवरून अनिल मस्के, रूसांगोला), किसन लोणारी, महेश गोडसे (रा. सांगोला) व पुरवठादार बिपीन तेजवानी व अबुभाई हिप्परकर (दोघे न रा. अथणी, कर्नाटक) यांच्याविरुद्ध करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात गुटखा माफियांचा हैदोस सुरूच असून पोलीस मात्र बघ्या ची भूमिका घेत असल्याची नागरिकांमधून चर्चा होत असून

पुणे दक्षता विभाग व सोलापूर अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे, नमुना सहायक श्रीशैल

हिटनहळ्ळी यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. २) अनिल मस्के यांच्या मस्के पान शॉपमध्ये धाड टाकली. यावेळी त्यांना प्रतिबंधित अन्नपदार्थाचा (गुटखा) साठा आढळून आला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मस्के यांचे पान शॉप, गोदामावर कारवाई करून दुकान व गोदाम सील केले. या कारवाईत ४ लाख ५३० रुपयांचा गुटखा व ५ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी असा ९ लाख ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल मस्के, अक्षय मस्के (दोघे रा. मस्के कॉलनी, सांगोला), किसन लोणारी, महेश गोडसे (रा. सांगोला) व पुरवठादार बिपीन तेजवानी व अबुभाई हिप्परकर (दोघे रा. अथणी, कर्नाटक) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.