सोलापूर (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार
स्वीकारल्यानंतर प्रशासनात सुधारणा व कार्यशिलता वाढविण्यासाठी १०० दिवसांचा उपक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये 'कार्यालयीन सुधारणा' या बाबीत प्रलंबित प्रकरणांची निर्गती, स्वच्छता, अभ्यागतांसाठी सुविधा आदी सात मुद्द्यांवर सुधारणा करण्यासाठी सूचित केले होते. त्यात सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने चौथा क्रमांक पटकावला आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २५ पोलिस ठण्यांना भेटी देऊन या उपक्रमात सहभाग घेऊन कार्यालयीन सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले होते.
तसेच आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यात जिल्ह्यातील पोलिस ठाण्यास फर्निचर उपलब्ध करून दिले. तसेच इमारतींना रंगरंगोटी केली. तक्रारदारांसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक, प्रलंबित गुन्हे, अर्ज, मुद्देमाल, आरोपी दत्तक योजना तसेच स्मार्ट पोलिस असे महत्त्वाचे विषय हाती घेऊन नियोजित कार्यक्रम आखून दिला. त्यावर देखरेख करून निर्गती करून घेतली. जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक कार्यालयात सुधारणा करून कार्यालयाचा कायापालट केला. त्यानुसार १०० दिवसांच्या कामाचा अहवाल शासनास सादर केला होता. त्याचे मूल्यमापन विशेष समितीमार्फत होऊन निकाल जाहीर झाला. त्यामध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयास चौथा क्रमांक मिळाला. या विशेष कामाबद्दल पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी सर्वांचेच
अभिनंदन केले आहे.
.jpg)