सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास इत्यादी विषयावर पत्रकार सुरक्षा समितीचे वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा पत्रकार सुरक्षा समिती सातत्याने प्रयत्न करत आहे. पत्रकार सुरक्षा समिती च्या मराठवाडा विभाग अध्यक्ष पदी धाराशिव येथील बाळासाहेब शिंदे यांची नुकतीच फेर नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा सोलापूर येथे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी नियुक्ती पत्र ओळख पत्र देऊन सन्मान केला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस जिल्हा संघटक सादिक शेख पत्रकार शोएब काझी नंदकुमार कांबळे बनसोडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
.jpg)