Type Here to Get Search Results !

सोलापूर तालुका,पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन




   सोलापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय सुशासन मिशन च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांनी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 13.05.2025 रोजी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेयेथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. 

        सदर रक्तदान शिबीरा करीता सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील पोलीस पाटील यांच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी नागरिकांना आवाहन केले होते 

       रक्तदानामुळे गरजु रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचवावे रक्तदाना बाबत नागरिकां मध्ये जनजागृती व्हावी, सामाजिक बांधिलकी जपावी रक्ताचा तुटवडा भरून काढावा. तसेच रक्तदानाच्या वेळेस रक्तदात्याची आरोग्य तपासणी केली जाते. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची माहिती मिळते या उद्देशाने रक्तदान शिबीराचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर यांच्या वतीने आयोजन केले होते.

        आयोजित करण्यात आलेल्या रक्तदाना शिबीरा मध्ये राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक यांनी स्वता सहभाग नोंदवुन रक्तदान केले आहे. तसेच पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व पोलीस अंमलदार व नागरिकांनी रक्तदान केले आहे. 

    अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन सोलापूर ग्रामीणच्या कार्यक्षेत्रात '' मिशन विकसित गाव '' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गावा गावातील जमिनीची

पाण्याची पातळी वाढविणे करता शेतक-यांना प्रबोधन करणे, तलावातील पाण्याची पातळी वाढविणे तलावातील गाळ काढणे या करीता तहसील कार्यालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करणे, उत्तम शेतीचा विकास साधता येणे करीता कृषी विभागाच्या मदतीने शेततळे योजना राबविणे, गावातील ग्रामपंचायत शाळा मध्ये सौर उर्जेचा वापर करणे, मधुमक्षिका पालन करणे, गावामध्ये हरीत क्रांती घडवण्याठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणेचा उद्देश आहे. 




  अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मौजे हिरज गावा मध्ये 5 जलतारा खड्डे घेण्यात आले आहेत. सपोनि/मनोज अभंग यांनी पोलीस अंमलदार यांचेसह मौजे कुरूल येथे 1 जलतारा खड्डा घेण्यात आला आहे. यापुढे कार्यक्षेत्रातील गावामध्ये '' मिशन विकसित गाव '' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.