सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर येथील बापूजी नगर येथील रहिवासी असलेले कुल्फी विकणारे महमद शेख यांची मुलगी सानिया वालचंद कॉलेजमधून इयत्ता बारावी मध्ये 92.67% टक्के घेऊन प्रथम क्रमांक मिळवले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय महासचिव फारूक मटके सर मित्रपरिवार तर्फे सानिया शेख यांचा पुष्प हार कपडे व रोख रक्कम रु. 13000/- (तेरा हजार रुपये) देऊन सत्कार करून समाजसेवक फारुख मटके यांनी सामाजिक बांधिलकी जपत सानिया शेख यांच्या पुढील शिक्षणासाठी सर्वोपतरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आले. सदर प्रसंगी सानिया चे आई वडील, व परिवारतील सर्व सदस्य व शरीफ भागनगरी, शफी चितापुरे, इस्माईल जमादार, दाऊद इरकल, सलीम पीरजादे, अतहर परवेझ दफेदार , अबुबकर नललामंदु, एजाज शेख, रिझवान शेख, महमदअली तारकश आदी मान्यवर उपस्थित होते.
