सोलापूर (प्रतिनिधी) - दिनांक १५ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान वतीने सभासद स्नेहमेळावा आणि वार्षिक बैठकीचे आयोजन ग्रामीण पोलीस मुख्यालय सोलापूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण डंके जिल्हा कोषागार कार्यालय अधिकारी सोलापूर, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर, विजयालक्ष्मी कुर्री पोलीस उपअधिक्षक, यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र हे होते. सदरील कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथे मृत्यू पावलेल्या नागरिकांना दोन मिनिटे उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर पोलीस उपअधीक्षक विजयलक्ष्मी कुर्री व जिल्हा कोषागार अधिकारी रामकृष्ण डंके यांनी
मार्गदर्शन केले.
निवृत्त वेतनधारकांना कोणतेही अडचण आली तर ती सोडवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
*वार्षिक बैठकीत झालेला ठराव :-*
1) सातव्या वेतन आयोगा प्रमाणे 10/20/30 आश्वाशीत प्रगती योजने अतंर्गत मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिल्या निकाल प्रमाणे शासन स्थरावर कार्यवाही झाली पाहीजे..
2) सेवानिवृत वेळी शासनास विकलेली पेन्शन मुदत 15 वर्षा वरुन कमी करुन ती 11.00 वर्षे 8 महीने करणे
3) सेवानिवृत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रेल्वे / बीएसएनएल / सैन्यदला प्रमाणे सुविद्या देण्यात यावी.
4) पोलीस अधिकारी व कर्मचारी ज्या दिवशी सेवानिवृत होतात त्याच दिवशी देय रक्कमा व पेन्शन दिली पाहीजे असे शासन व मा. पोलीस महासंचालक यांचे आदेशाची अमंलबजावनी झाली पाहीजे.
कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सचिव अरुण कदम यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी निवृत्त पेन्शन धारकांनी आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे आभार अध्यक्ष अनिल उकरंडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त पोलीस अधिकारी मिनाक्षीताई पेठे यांनी केले.
कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व पत्रकार यांच्या साठी अल्पोपहार, चहापान व नंतर खास करून "मुकद्दर का सिकंदर" या हिंदी व मराठी सदाबहार देशभक्ती पर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
.jpg)
