सोलापूर (प्रतिनिधी ) वाहन चोरी करणारा सराईत आरोपी उमेश नागनाथ भोसले याच्यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली. शहरातील फौजदार चावडी, जेलरोड तसेच जोडभावी पेठ या पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरी करणारा नागनाथ भोसले हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने मागील काही वर्षापासून सातत्याने मोटरसायकल चोरी करणे, घातक शस्त्राने धमकविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तो करत आला आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे हे कोण १२ गुन्हे दाखल आहेत. भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कृत्यापासून परावर्त करण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने त्याची कृती चालूच ठेवली. त्याच्या घरी कृतीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेच्या कारवाईचे आदेश दिले. त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस आयुक्त प्रताप पोमन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार आदींनी केली. एकंदरीत परिस्थिती पाहता तडीपारी सारख्या कारवाईत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा रुद्रावतार पाहता गुंडोवालो जरा होशियार यहा के हम हें राजकुमार या गाण्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
