सोलापूर (प्रतिनिधी ) शहर गुन्हे शाखेने तिघा चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून २ दुचाकी, १६ मोबाईल व १ मंगळसूत्र असा एकूण ३ लाख २८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दुचाकी चोरटा अभिजित महादेव पाटकुलकर (वय ४३, रा. करंदीकर बंगला, पंचायत समितीसमोर, अशोक नगर, बारामती), मोबाईल चोरटा युवराज गोरख कदम (वय ४१, रा. अंबाबाई मंदिराजवळ, रामवाडी, सोलापूर) व ओंकार गायकवाड (रा. स्वागत नगर, कुमठा नाका, सोलापूर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. गस्तीवेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडेकर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. १ एप्रिल रोजी दुचाकी विक्रीसाठी ताना बाना चौक
वल्याळ मैदान रस्त्यावर थांबलेल्या अभिजित यास पकडले. त्याच्याकडून एम एच १३ ई ए २८११, एम एच ४२ ए पी ५०७१ क्रमांकाच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या. याप्रकरणी अनुक्रमे
सदर बझार व बारामती पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
३ एप्रिल रोजी मोबाईल विक्रीसाठी गंगामाई हॉस्पिटलजवळ आलेल्या युवराज यास पकडले. त्याच्याकडून १६
मोबाईल हस्तगत केले. तपासात त्याने सोलापूरसह पंढरपूर, तुळजापूर अशा गर्दीच्या ठिकाणांहून मोबाईल चोरल्याचे आढळले. याप्रकरणी जेलरोड, सदर बझार पोलिस ठाण्यात तीन मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर येथील गड्डा यात्रेत चोरलेले मंगळसूत्र विक्रीसाठी अशोक चौकातील सावरकर उद्यानाजवळ आलेल्या ओंकार यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून ९३ हजारांचे मंगळसूत्र हस्तगत केले.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बाळासाहेब काळे, सायबरकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी ही कारवाई केली.
.jpg)