सोलापूर चे युवा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या नेतृत्वात सोलापूर शहर पोलीस दलाची आगळी वेगळी ओळख"
"गुन्हेगारीला चपराक विश्वासाला वेग – सोलापुरात पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचं धडाडीचं पोलिसिंग"
सोलापूर शहराच्या रस्त्यावर शांती आहे, नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना आहे, आणि गुन्हेगारांच्या डोळ्यांत भीती आहे – हे बदलेलं चित्र कोणाच्या चमत्काराने नव्हे तर एका डॅशिंग युवा आयपीएस अधिकाऱ्याच्या धडाडीच्या कामगिरीने घडलेलं आहे. त्या अधिकाऱ्यांचं नाव युवा पोलीस आयुक्त एम. राजकुमार!
सोलापुर शहराची जबाबदारी व सूत्रे हाती घेताच अंगीकारली गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची शपथ
2023 मध्ये पोलीस आयुक्तपदाची सूत्रं हाती घेताच पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापूरच्या समस्यांचा थेट सामना केला. शहरात पसरलेली गुन्हेगारी, वाढते ड्रग्ज रॅकेट, सायबर फसवणूक, आणि, सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम – या सगळ्यावर त्यांनी ‘नो नॉनसेन्स अॅप्रोच’ने काम सुरू केलं.
MCOCA, तडीपारी आणि NDPS अंतर्गत धडाकेबाज कारवाया गुन्हेगारांचा डेटा
अॅनालिसिस टोळीप्रमुखांवर चुकीला माफी नाहीच या म्हणीचा प्रत्यय आणत थेट गुन्हेगारावर मोक्का तडीपारी सारखी कडक कारवाई करत सोलापूर शहरातील गुन्हे उघडकिस आणण्याचे प्रमाण राज्यात आघाडीवर नेऊन ठेवले
ड्रग्जचा अडवलेला प्रवाहाने नासणाऱ्या सोलापूरमधील तरुणाई वाचवली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी
सोलापूरला लागलेली ड्रग्जची कीड मूळासकट उपटण्याचं काम केलं.
लाखो रुपयांचा ड्रग्ज जप्त करत तस्करांच्या मुसक्या आवळल्या
शाळा–कॉलेजांमध्ये जनजागृती मोहीम
पोलिस दलात 'ड्रग्ज टास्क फोर्स' सक्रिय
"पोलीस म्हणजे फक्त वर्दी नाही – तर मदतीचा हात"
हे वाक्य कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कामातून प्रत्यक्षात उतरलेलं आहे.
प्रत्येक तक्रार गंभीरपणे ऐकणं
‘जनसंवाद’, ‘ओपन हाऊस’, ‘सखी हेल्पलाइन’
सायबर सेलची मजबूत यंत्रणा
विना मध्यस्ती नागरिकांना थेट पोलीस आयुक्त पर्यंत पोहचण्याचा मार्ग खुला
सण–उत्सवांचं कुशल व्यवस्थापन – सलोख्याचा पाठकथा शिव जयंती
गणेशोत्सव, ईद, मोहरम, आंबेडकर जयंती, नवरात्र महोत्सव सारख्या सोलापूर शहरातील
या प्रत्येक सणात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी धार्मिक नेत्यांशी समन्वय साधून शांतता आणि सौहार्द टिकवलं. तणावग्रस्त भागात विशेष बंदोबस्त आणि संवादामुळे शहरात एकताही नव्या उंचीवर पोहोचली
पोलीस दलात 'डिसिप्लेन मोटिवेशन' मॉडेल
अंतर्गत गैरशिस्त, भ्रष्टाचार यावर कठोर कारवाई
कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी नियमित संवाद
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
पोलीस दलाच्या मानसिक स्वास्थ्यावरही लक्ष
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचं पोलिसिंग म्हणजे कायद्याचा सन्मान, आणि माणुसकीची जाणीव – सोलापूरकर त्यांच्या नेतृत्वावर नितांत विश्वास ठेवतात.
सोलापूरमध्ये एक नवा युगप्रवेश घडतोय – जेव्हा गुन्हेगार सावध होतात, आणि जनता निर्धास्त होते… तेव्हा समजावं की पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या सारखं युवा नेतृत्व आपल्या शहरात कार्यरत आहे. एकंदरीत सज्जनांचा आधार तर गुन्हेगारांचा कर्दनकाळ हे ब्रीद वाक्य सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना तंतोतंत लागू होते.
यशवंत पवार
संपादक - साप्ताहिक कार्यसम्राट
संपादक - कार्यसम्राट न्यूज सोलापूर
