सोलापूर (प्रतिनिधी ) जे का रंजले गांजले त्याची म्हणू जो आपुले देव तेथेची जाणावा साधू तोची ओळखावा या म्हणी प्रमाणे मुळचे बेगमपूर आता मंगळवेढा येथे अमोल कनीग उद्योग कारखाना चालवून समाजातील बेरोजगार युवकांना व्यवसायात आणून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवून आपली सामाजिक बांधिलकी जपली असून तानाजी माने यांनी गोंधळी समाजाचे युवा नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओळख निर्माण केली असून समाजातील वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या मदतीसाठी तानाजी माने हे नेहमीच धावून जातात साखरपुडा लग्न असो वा मयत तानाजी माने हजर असतात समाजातील लोकांची कोणतीही अडचण निर्माण झाली की तानाजी माने यांना निवारण करण्यासाठी बोलावलं जातंय समाजातील लोकांच्या सामाजिक आरोग्य विषयक त्याचबरोबर इतर अडचणीत तानाजी माने ऊन वारा पाऊस व वेळेचे बंधन पाळून केवळ आणि केवळ सामाजिक आवड व बांधिलकी म्हणून समाजातील लोकांच्या अडचणीत आपल्या हातातील काम धंदा सोडून व कौटुंबिक अडचण बाजूला सारून समाजासाठी काय पण म्हणत धावून जातात समाजाची यात्रा जत्रा किंवा उत्सव असो तानाजी माने यांना घेतल्या शिवाय समाज बांधव करत नाहीत त्यांच्या या कार्याची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेऊन युवा नेते तानाजी माने यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर केला आहे अशी माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) यांनी दिली आहे. तानाजी माने यांना पत्रकार सुरक्षा समिती 2025 चा राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक म्हणून पुरस्कार मिळाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाजासाठी झटणारा युवकाला पुरस्कार मिळाल्याने तानाजी माने यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
