सोलापूर (प्रतिनिधी ) पोलिस दलात विविध प्रकारच्या प्रवर्गात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपतीचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक व शौर्य पदक प्राप्त केलेल्या राज्यातील ८०० पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बोधचिन्ह, सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. त्यामध्ये सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस दलातील १९ पोलिस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. महाराष्ट्र दिनाच्या समारंभात पोलिस पदक देऊन पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पोलिस दलात उत्कृष्टपणे योगदान देत सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर भर देणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलिस महासंचालकाकडून विशेष बोधचिन्ह मंजूर केले जाते. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सोमवारी बोधचिन्ह मंजूर झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली यामध्ये जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दादासाहेब सरवदे यांचा समावेश आहे.
महासंचालकांचे बोधचिन्ह मिळालेले अधिकारी कर्मचारी खालील प्रमाणे
सोलापूर शहर पोलिस : संगीता पाटील (पोलिस निरीक्षक), नागनाथ कानडे (पोलिस उपनिरीक्षक), शैलेंद्र सातपुते (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक), दिलीप किर्दक (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक), विलास इंगळे (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक), सिद्धू थोरात (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक), महंमद करणाचे (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक), मकरंद कुलकर्णी (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक), राजेंद्र बंडगर (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक), गुरुसिद्धप्पा इंगळगी (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक), विजय पौळ (पोलिस हवालदार), दीपक चव्हाण (पोलिस हवालदार), विनोद चौहान (पोलिस हवालदार), दीपक डोके (पोलिस शिपाई), दादासाहेब सरवदे (पोलिस शिपाई).
सोलापूर ग्रामीण पोलिस : विनोद घाटे (ग्रेड पोलिस उपनिरीक्षक), चंद्रकांत पवार (सहायक पोलिस उपनिरीक्षक), सुभाष शेंडगे (सहायक पोलिस उपनिरीक्षक), संतोष गायकवाड (पोलिस हवालदार) यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
