सोलापूर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यातील जनसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी न्याय मिळून देण्याकरिता प्रयत्न करणारे, तसेच गरीब, पीडित,वंचित नागरिकांच्या अनेक विषयात समाजसेवेच्या माध्यमातून प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करणारे शोएब काझी यांची नुकताच भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.शोएब काझी यांना सोलापुरात धाराशिव चे माजी नगराध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते पत्रकार सुरक्षा समिती मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे (तात्यासाहेब) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आला. त्यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, भ्रष्टाचार विरोधी मंच चे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस पत्रकार बनसोडे सिद्धार्थ भडकुंबे इत्यादी उपस्थित होते .
.jpg)