Type Here to Get Search Results !

अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा दणका




सोलापूर (प्रतिनिधी)  माढा तहसीलदार विनोद रणवरे यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गौण खनिज विषयक बाबींमध्ये करावयाची विहित मुदतीतील कारवाई असमाधानकारक असल्याचे निर्देशनास आले होते. माढा तालुक्यातील उजनी धरण कार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने 13 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रा अन्वये संबंधितांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून तहसीलदार माढा श्री. रणवरे यांच्या विरोध निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांना सादर केलेला होता. 

    याप्रकरणी शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 23 एप्रिल 2025 च्या आदेशान्वये माढा तहसीलदार श्री. विनोद रणवरे यांनी कार्यालय प्रमुख या नात्याने कामकाजावर नियंत्रण ठेवले नसलेचे  आणि कार्यालयीन तपासणीतील बाबींबाबत संधी देऊनही सुधारणा केली नाही. तसेच अवैध गौण खनिज प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई केलेली नसणे, खाणपट्टा मंजुरीच्या अनुषंगाने मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदतीनंतर ही वरिष्ठ कार्यालयास सादर न करणे तसेच कार्यालयाच्या तपासणीनंतर शतकपूर्तीवेळी सदरच्या बाबी निदर्शनास आलेल्या असतानाही श्री. रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्यामुळे त्यांना शासनाने निलंबित केलेले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

      माढा तालुक्यातील अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण न ठेवणे व अन्य प्रशासकीय बाबीतील अनियमिततेमुळे माढा तहसीलदार श्री. विनोद रणवरे यांना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वी सनाला पाठवण्यात आलेला होता, त्या अनुषंगाने शासनाने दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी च्या आदेशान्वये माढा तहसीलदार श्री. रणवरे यांना  निलंबित केलेले आहे. तरी यापुढे अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण न ठेवणे तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितावर अशीच कठोर कारवाई करण्यात येईल." 

असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.