रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ आणि रोटरी क्लब तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'रामायण तंबोला ' या रामायणावर आधारित असलेल्या खेळाचे दि.२७ एप्रिल रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते..
रामायणावर आधारित असलेल्या प्रश्नोत्तरांच्या या मनोरंजनात्मक उपक्रमाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला. यामध्ये भरगोस बक्षीसांची देखील लयलूट करण्यात आली.
याप्रसंगी रोटरी नॉर्थ क्लबच्या अध्यक्षा रोटे जानवी माखीजा, सेक्रेटरी ॲड.स्वप्नील कोंडगुळे, संस्कृतीक प्रमुख मधुरा वडापूरकर आणि नमिता पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ तुळजापूर चे अध्यक्ष रोटे प्रशांत अपराध तसेच बहुसंख्य रोटरिअनची उपस्थिती होती..
कार्यक्रमाचे संयोजन प्रभा अग्रवाल यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण सारडा यांनी केले..
