Type Here to Get Search Results !

कोरटकरवर हल्ल्याची भीती. पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या त्या बातमीनं सगळ्यानाचं चकवा



कोल्हापूर : (प्रतिनिधी) 

*छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या*, *त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे*. 

*आज त्याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका झाली*. 

*दोन दिवसांपूर्वी मे.जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरला सशर्त जामीन दिला होता*. 

*पण शासकीय सुट्टीमुळे यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नाही.* 

*अखेर आज ही प्रक्रिया पूर्ण झाली*. 

*त्यानंतर कोरटकरची तुरुंगातून सुटका करण्यात आली*. 

*यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता*

*कोरटकर* वर मे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात दोनदा हल्ला झाला आहे. 

सुनावणीच्या सुमारास *कोरटकर* वर हल्ल्याचे प्रकार घडले. 

*कोटककर* नं केलेल्या विधानामुळे शिवशंभू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. 

त्यामुळे त्याच्या विरोधात प्रचंड रोष आहे. 

याच कारणास्तव त्याची तुरुंगातून सुटका होत असताना पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. 

सुटकेनंतर *कोरटकर* ला नेमकं कुठे सोडलं जातंय ?, 

याबद्दल पोलीसांनी कमालीची गुप्तता पाळली होती.

*कोरटकर* ला विमानानं बंगळुरुला पाठवण्यात येईल. 

त्यानंतर तिथून तो नागपुरला जाईल, अशी माहिती आधी पुढे आली होती.

 पण प्रत्यक्षात मात्र *कोरटकर* कोल्हापूरवरुन मुंबईच्या दिशेनं रवाना झाला.

 तो विमानानं मुंबईला येत आहे. 

मुंबईवरुन तो नागपुरला जाणार आहे. 

*कोरटकर* मूळचा नागपूरचा रहिवासी आहे. 

*कोरटकर* ला बंगळुरुला पाठवण्यात येणार असल्याची 'बातमी' पेरुन पोलीसांनी सगळ्यांनाच चकवा दिला. 

प्रचंड गुप्तता पाळत पोलीसांनी *कोरटकर* ला मुंबईच्या दिशेनं रवाना केलं.

कळंबा कारागृहातून पोलीस *कोरटकर* ला घेऊन बाहेर पडले. 

त्यावेळी तिथे मोठा पोलीस बंदोबस्त होता. 

पोलीस *कोरटकर* ला घेऊन बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या गाड्या रोखण्यात आल्या. 

पोलीसांनी माध्यम प्रतिनिधींची वाहनं थांबवल्यानं मोठा गोंधळ झाला.

 यावेळी माध्यम प्रतिनिधी आणि पोलीसांमध्ये काहीशी बाचाबाची झाली. 

*कोरटकर* ला विमानतळापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यात कोल्हापूर पोलीस यशस्वी ठरले.

 *कोरटकर* काही वेळात मुंबईत दाखल होईल. 

तिथून कनेक्टिंग फ्लाईटनं तो नागपुरला रवाना होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.