Type Here to Get Search Results !

No title



सोलापूर (प्रतिनिधी) तीन लाख रुपयांच्या

कारमधील (एमएच ०३, डीएक्स ७३०८) सव्वाचार किलो गांजा जोडभावी पेठ पोलिसांनी जप्त केला आहे. श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डासमोरील समर्थ कोल्ड स्टोअरेजजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. परशुराम भानुदास हेळकर (रा. साकी विहार रोड, पवई, मुंबई) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक

पोलिस निरीक्षक सोमनाथ पडसळकर हे गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री आपल्या पथकासह बाजार समिती, शेळगी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना बाजार समितीसमोरून शेळगीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एक मुंबई पासिंगची कार थांबलेली दिसली. चालकाने कपाळावर वारकऱ्यांसारखा गंध लावलेला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यास गाडी बंद पडलीय का?, काही मदत हवीय का म्हणून विचारणा केली. त्यावेळी त्यानें

 पंढरपूर येथे दर्शनासाठी आलो होतो, नातेवाइकाकडे निघालोय असे उत्तर दिले. पण, पोलिसांसोबत बोलताना तो थोडा घाबरलेला होता. पोलिसांनी त्याचे हावभाव टिपले आणि कार तपासायला सुरवात केली. कार तपासताना डिक्कीतील पिशवीत दोन- दोन किलो गांजा असलेली पाकिटे पोलिसांना मिळाली. त्याला त्यासंदर्भात विचारणा केली, पण उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संशयितास ३ दिवस पोलिस कोठडी

पंढरपूरला दर्शन करून आलो होतो म्हणून सांगणाऱ्या परशुराम हेळकर (वया ४७) याच्याकडील कारमध्ये पोलिसांना गांजा मिळाला. 'मी असला व्यवसाय करत नाही, पहिल्यांदाच केला' असे म्हणणाऱ्या परशुरामला पोलिसांनी अटक करून शुक्रवारी (ता. ११) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याल रविवारपर्यंत (ता. २०) पोलिस कोठडी ठोठावली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.