Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समितीची बेगमपूर येथे बैठक व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्धार.



मोहोळ (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती तालुका मोहोळ ची बेगमपूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद होते या बैठकित 

पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या बैठकीत राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच पत्रकारांच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला 

*पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष न घातल्यास रस्त्यावर उतरावं लागेल*

*प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार आक्रमक*

राज्यात पत्रकारांचे प्रश्न जटील होत असून ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष 

न घातल्यास पत्रकारांच्या प्रश्नावर पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन कराव लागेल असा इशारा प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष यशवंत पवार यांनी बैठकित दिला 

*पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यसरकार उदासीन का*? जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार यांचा संतप्त सवाल

पत्रकार सुरक्षा समिती वतीने पत्रकारांच्या प्रश्नावर वारंवार निवेदन देऊन देखील पत्रकारांचे प्रश्न का सोडवले जात नाहीत? असा संतप्त सवाल जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार यांनी उपस्थित करून पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन का आहे? असा प्रश्न अमर पवार यांनी सरकार ला केला आहे.

या बैठकीला जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर तालुका सचिव वजीर मुलाणी तालुका प्रसिद्धी प्रमुख महादेव शेवाळे अजय तोडकर दादा सुरवसे उपस्थित होते. यावेळी राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.