Type Here to Get Search Results !

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा विविध कार्यक्रमास उपस्थिती



 सोलापूर (प्रतिनिधी ) राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दिनांक 02 व 03 एप्रिल 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

 बुधवार दिनांक 02 एप्रिल दुपारी विमानाने सांताक्रुज विमानतळ मुंबई येथून 03.30 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.35 वा. सोलापूर येथून मोटारीने हन्नूर ता. अक्कलकोट कडे प्रयाण. दुपारी 04.15 वा. हन्नूर येथे आगमन व भव्य हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत समारंभास उपस्थिती-( स्थळ हन्नूर ,केसरी मैदान, चैतन्यनगर ). सायंकाळी. 5. 15 वा. हन्नूर येथून अक्कलकोट कडे प्रयाण व 05.45 वा . अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे आगमन व दर्शना साठी राखीव. सायं. 06.00 वा. श्री स्वामी समर्थ मंदिर येथून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवास्थाना कडे प्रयाण व सायं.06.05 वा. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवास्थानी राखीव. सायं. 07.00 वा अक्कलकोट येथून सोलापूर कडे प्रयाण. व 7.45 वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 


               गुरूवार दि.03 एप्रिल 2025 रोजी सकाळी 09.00 वा. सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी विविध विषयांवार चर्चा (स्थळ – शासकीय विश्रामगृह) नंतर स. 10.00 वाजता आयुक्त सोलापूर म.न.पा. , जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. , पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांचेशी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा. (स्थळ – शासकीय विश्रामगृह) . सकाळी.10.50 वा. शासकी विश्रामगृह येथून लिंगशेट्टी कार्यालया कडे ( बाळीवेस) प्रयाण . सकाळी 11.00 वा. लिंगशेट्टी कार्यालय येथे आगमन व भारतीय जनता पार्टी जिल्हास्तरीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 01.00 वा. लिंगशेट्टी कार्यालय येथून माजी आमदार दिलीप माने (होटगी रोड) यांच्या निवासस्थाना कडे प्रयाण राखीव. दुपारी 01.50 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण , व 02.00 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी येथे आगमन व विविध विभागाकडील आढावा बैठकीस उपस्थिती. नंरत सायं.05.00 वा. सोलापूर येथून पंढरपूर कडे प्रयाण. सायं. 06.00 पंढरपूर, वैष्णवनगर येथे आगमन व समस्त वारकरी मंडळ गोंदवले बु. ता. माण यांचे नियोजित वास्तूचे भूमिपुजन समारंभास उपस्थिती. सायं.06.30 वा. पंढरपूर येथून सांगोल्याकडे प्रयाण . सायं.7.00 वा. सांगोला येथे आगमन व दिपक साळुंके पाटील ,माजी आमदार यांचे वढेगाव नाका येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट. सायं 7.15 वा. राजयोग अर्बन को-ऑफ क्रेडीट सोसा.लि. सांगोला उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायं. 7.30 वा. सांगोला तालुका यांचे वतीने जाहीर सत्कार सकारंभास उपस्थिती. रात्री 8.30 वा. चेतनसिंह केदार सावंत भाजप जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामिण यांच्या निवास स्थानाकडे प्रयाण.व सदिच्छा भेट व राखीव. रात्री 08.55 वा. बाळासाहेब एरंडे यांचे निवासस्थानाकडे प्रयाण व सदिच्छा भेट व राखीव .त्यानंतर रात्री 09.30 वा. सांगोला येथून बोराटवाडी ता. माण जि.सातारा कडे प्रयाण करतील .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.