Type Here to Get Search Results !

स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या २६ व्या पुण्यस्मरणानिमित्त महाआरोग्य शिबीर




सोलापूर (प्रतिनिधी ) लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या २६ व्या पुण्यस्मरणानिमित्त लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान, सोलापूर आयोजित मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली.

मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. ०२ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. उ‌द्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून सोलापूरकरांच्या सेवेत मोरे प्रतिष्ठानचे समाज कार्य सुरु होणार असून सदर शिबीरात ५०० बाटल्या रक्तदान व २०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तातील विविध तपासण्या, शुगर बीपी-धुंकी – लघवी – ईसीजी मशीन हृदय तपासणी व अन्य आजारांच्या तपासण्या या शिबीरात होणार असून शस्त्रक्रियेस पात्र रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप व आवश्यक औषध-गोळ्या मोफत दिले जातील. आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले जातील. या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मा. बाळासाहेब मोरे केले. यावेळी शिवानंद पाटील, शांतय्या स्वामी, संजय टोणपे, उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.