Type Here to Get Search Results !

फौजदार चावडी पोलिसांकडून १४ लाख ६४ हजारांचा गांजा जप्त, फोन करण्याच्या बहाण्याने वाहन चालकाने काढला घटनास्थळावरून पळ.




सोलापूर (प्रतिनिधी ) दिनांक 4/03/2025 रोजी रात्री 11.15 वा वेळी शहर वाहतुक शाखा सोलापूर शहर कडील पोहेकों 34 प्रकाश निकम व पोकों 1532 भालेराव यांना वाहतुक कारवाई संबंधाने रात्र डयुटी देण्यात आली होती. वाहन तपासणी दरम्यान सोलापूर पुणे सर्व्हिस रोडने जंगली हॉटेल जवळ, विजापूर बायपास ओव्हर ब्रिजचे सव्हिस रोडवर विटकरी कलरची कार क्र.MH 47 AN 8917 यास चेक करत असताना त्याचा चालक हा कागदपत्र दाखवितो असा बहाणा करून फोनवरुन बोलत दूर जावून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. त्यावर सदर वाहनाचा संशय आल्याने त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता या वाहनाच्या डिक्कीमध्ये गांजा दिसून आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने फौजदार चावडी यांच्याशी  संपर्क करुन सदर घटनेच्यासंबंधाने माहीती दिली.

त्यावर त्याबाबत मा वरिष्ठांना माहीती देवून त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सुचीत केले आहे. त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करुन पो स्टे फौजदार चावडी, सोलापूर शहर येथे वाहन कार क्र.MH 47 AN 8917 चा चालक याच्याविरुध्द गुन्हा रजि क्र. 118/2025 NDPS Act कलम 8(C), 20 (B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे


या कारवाईमध्ये एकूण 48 किलो गांजा ज्याची किं अं 864000 रु तसेच वाहन वाहन कार क्र.MH 47 AN 8917 ज्याची किं अं 600000 रु असा एकूण 1464000 रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गांजा हा कोठून आणला व कोठे घेवून जात होता? सदर गाडी कोणाची आहे? याबाबतचा तपास चालू आहे.



सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री एम. राज कुमार, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) श्री विजय कबाडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, विभाग 1, श्री प्रताप पोमण यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोनि तानाजी दराडे, सपोनि शंकर धायगुडे, सपोनि रोहन खंडागळे, पोह 1232 प्रविण चुंगे, पोकॉ 1456 कृष्णा बहुरे, पोकों 1617 दत्तात्रय कोळवले, पोकों 1612 नितीन जाधव यांनी कामगिरी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री तानाजी दराडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.