सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ समजून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र गेल्या दहावर्षांपासून सोलापूर जिल्हा सह राज्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक बातम्याचा वेगवान आढावा घेऊन अविरत पणे सामाजिक बांधिलकी म्हणून साप्ताहिक कार्यसम्राट ने आजवर आपली भूमिका बजावली असून समाजातील तळागांळाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित पिढीत घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या पुणे प्रतिनिधी पदी युवा पत्रकार पांडुरंग आडम यांची नुकतीच निवड करण्यात आली असून सोलापूर येथे साप्ताहिक कार्यसम्राट चे पत्रकार राजूवग्गू यांच्या हस्ते पांडुरंग आडम यांचा पुष्पहार शाल नियुक्ती पत्र व ओळख पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संपादक यशवंत पवार अंबादास गज्जम लक्ष्मण सुरवसे नरेश वग्गू उपस्थित होते पुणे येथील पत्रकार पांडुरंग आडम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
.jpg)