सोलापुर (प्रतिनिधी ) सोलापुर शहरातील वाढलेले अतिक्रमण,स्वच्छता,पाणीपुरवठा ,ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर समोरील शौचालय,एँडव्हेंचर पार्क या इतर समस्यांबाबत महानगरपालिकेचे आयुक्त डाॅ.सचिन ओंबासे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरच समाधानकारक कारवाई करु असे आश्वासन यावेळी पालिका आयुक्त डाॅ.सचिन ओंबांसे यांनी दिले.
पालिका आयुक्तांनी लवकरच योग्य तो निर्णय घेऊन सोलापुरवासियांना दिलासा द्यावा अन्यथा संवैधानिक पध्दतीने आंदोलन करु असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी दिला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण,शहर प्रमुख महेश धाराशिवकर, निवडणुकयंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार,
शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर,उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर विधानसभा संघटक दत्ता माने,शिवा ढोकळे,जगदीश कलकेरी,अजय खांडेकर
अमित भोसले,राम वाकसे,उज्वल दिक्षित यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
