सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी सोलापूर शहराच्या उपनिबंधक प्रगती बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश पणनचे उपसचिव संतोष देशमुख यांनी पणन संचालकांना काढले आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशाने सुरू झाल्यानंतरही प्रशासकाची तत्काळ झालेली बदली अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली आहे
बाजार समितीच्या
संचालक मंडळाची मुदत व सहा-सहा महिन्यांच्या
दोन मुदतवाढी संपल्यानंतर पणनचे उपसंचालक मोहन निंबाळकर यांच्याकडे बाजार समितीच्या प्रशासकपदी मोहन निंबाळकर यांची १६ जुलै २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे
त्यांनी जवळपास सात महिने १८ दिवस प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. बाजार समितीचे प्रशासक म्हणून काम करताना निंबाळकर यांच्या विरोधात शासनाकडे गंभीर तक्रारी दाखल झाल्या आहेत, या तक्रारींवरून हा पदभार काढण्यात आला असल्याचे उपसचिव देशमुख यांनी या पत्रात म्हटले आहे. नूतन प्रशासक बागल यांनी शहर उपनिबंधकाचा मूळ पदभार सांभाळत बाजार समिती प्रशासकाचा अतिरिक्त पदभार सांभाळावा अशी
सूचनाही करण्यात आली आहे. बाजार समितीच्या प्रशासक बदलाचा आदेश आज झाला असून नूतन प्रशासक बागल या (गुरुवारी, ता. ६)
पदभार घेण्याची शक्यता आहे. बाजार समिती निवडणूक प्रक्रिया ४ आठवड्यात करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. एका महिन्यासाठी ऐन निवडणुकीच्या काळात
बाजार समितीवर नवीन प्रशासक आले आहेत.
