Type Here to Get Search Results !

अनिस व समविचारी मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांचे वतीने सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार.

 


फलटण (विक्रम वाघमारे ) साथी फलटण शाखा आणि समविचारी समता संघटना वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समता घरेलू महिला कामगार आणि सामाजिक बांधिलकी असणार्या महिलांना अंनिस  शाखा फलटण वतीने

अंनिस समाज प्रबोधिनी पुरस्काराने ॲड. कांचनकन्होजाताई धोंडीराम खरात,  कल्पनाताई मोहिते, नकुसा फरतडे,साजिया  यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रम चे आयोजन व नियोजन कल्पना मोहिते यांनी  केले होते तसेच सूत्रसंचालन केले,अंनिस फलटण शाखेचे कार्यकर्ते वसिम शेख अयाज आतार आरती काकडे आणि मोहिनी भोंगळे यांनी कार्यक्रमाची  जबाबदारी घेतली.अध्यक्षस्थानी  आनंद देशमुख होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दादासाहेब चोरमले सुपर्णाताई अहिवळे तसेच मंदाकिनी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन व महिलांच्या अंधश्रद्धा यांवर भाष्य केले. त्याचबरोबर अंनिसचे कार्यकर्ते गिरीश बनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांना मार्गदर्शन केले.अंनिसचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव सर यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा महिलांना वाटल्या,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन झाले, ॲड. कांचनकन्होजाताई यांना  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. अशा पद्धतीने महिलादिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.