फलटण (विक्रम वाघमारे ) फलटण येथील सोमवार पेठेतील नागरिक धुळीमुळे हैराण झाले आहेत. फलटण बारामती रस्त्यावर रस्त्याचे नवीन काम सुरू असून, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावरील धुळी ने लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे. रस्त्याच्या बाजूला जवळपास ३ हजार पेक्षा जादा लोक राहतात त्यांच्या घरांमध्ये धूळ येत असून रस्त्याचे काम घेतलेला ठेकेदार रस्त्यावर पाणी मारत नसल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे
या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. लहान मुलांच्या श्वासनलिकेला भविष्यात धोका होऊ शकतो, येथील नागरिकांना वाटते. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर अपघात झाला होता ज्यामुळे ठेकेदाराच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांनी ठेकेदाराला कामावर आळा घालण्याची मागणी केली आहे आणि धूळ कमी करण्यासाठी तात्काळ पाणी मारून धुळीचे प्रमाण कमी करण्याची मागणी होत आहे
रस्त्यावरील धूळ कमी न झाल्यास आंदोलन करणार
नगरसेवक विक्रम जाधव यांचा प्रशासनाला इशारा
फलटण बारामती रस्त्यावर प्रचंड प्रमाणात धूळ साचली असून या रस्त्याचे काम करणारे ठेकेदारांना सोमवार पेठ मधील नागरिकांच्या जीवाशी देणे घेणे नसून या धुळीमुळे अनेक जण आजारी पडत आहेत ठेकेदाराने व्यवस्थित काम न केल्यास आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा नगरसेवक विक्रम जाधव यांनी दिला आहे

