Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती व क्षितिज पर्व फाउंडेशनच्या वतीने साड्या वाटप जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण भागातील होतकरू महिलांचा सन्मान.



पनवेल (प्रतिनिधी)

क्षितिज पर्व फाउंडेशन आणि पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त होतकरू महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी साडी भेट देण्यात आल्या. पनवेल तालुक्यातील सांगटोली - नेरे येथील क्षितिज पर्व फाउंडेशनच्या जनधर्मा आधारगृहाजवळ सदर कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार सुरक्षा समितीचे रायगड - नवीमुंबई अध्यक्ष राज भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो होतकरू महिलांनी उपस्थिती दर्शविली.

महिलांनी परिस्थितीनुसार आजच्या डिजिटल युगात आपल्या जिवनात बदल करणे काळाची गरज आहे, आजी व नातीचे विचार एक व्हायला हवे, याकरिता हस्तक्षेप केला पाहिजे, असे मनोगत पत्रकार सुरक्षा समिती रायगड नवीमुंबईचे अध्यक्ष राज भंडारी यांनी व्यक्त केले. तसेच महिलांनी बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे, पूर्वी ८ वारी होती, आता ५ वारी साडी वापरले जाते, पूर्वी जात्यावर दळले जायचे आता मिक्सरचा वापर केला जातो. महिलांना आर्थिक, राजकीय, कौटुंबिक व सामाजिक हक्कासाठी झगडावे लागते, असे सांगून सध्याच्या बदलत्या युगातील माहिती देत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर क्षितिज पर्व फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पत्रकार सुरक्षा समिती रायगड नवीमुंबईचे सचिव सनिप कालोते, क्षितिष पर्व फाउंडेशन सचिव शितल कलोते, उपाध्यक्ष माई कलोते, खजिनदार रामा कलोते, सौं. पाटील, सौं. फडके आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.