Type Here to Get Search Results !

पैसे घेऊन बांधकाम कामगारांचे सुरू असलेले गृह वस्तू वाटप शिबिरे बंद करा कामगार संघटनां ची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी



 सोलापूर (प्रतिनिधी) 

                   महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, यांनी संयुक्तपणे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना लागू केले आहेत., त्यापैकी गृह वस्तु संच योजना असून, त्या गृह वस्तू योजनेत ठेकेदार व सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांनी संगणमताने कामगारांकडून पैसे घेऊन व हितसंबंध असलेल्या सामाजिक संघटनांकडून भांडी वाटपाचे शिबिरे भरून, गरीब बांधकाम कामगारांकडून १०००/-ते १५००/- रुपये घेऊन, भांडी वाटप करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सुरू असलेले शिबिरे त्वरित बंद करावीत, आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातच मोफत भांडी वाटप करावे., अशा मागणीचे निवेदन बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या, महाराष्ट्र कामगार सेना, संघर्ष कामगार संघटना, जय हिंद कामगार संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना, आणि इतर संघटनेचे प्रतिनिधी व प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  

                   सदर निवेदनात सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर, यांच्या कार्यालयामार्फत कामगारांना गृह उपयोगी संच मे. मफतलाल एजन्सी मार्फत दिला जातो. इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, मुंबई यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना कोणतीही, लेखी स्वरूपाचे आदेश नसताना, सहाय्यक कामगारांच्या परवानगी विना, कंपनीचे कर्मचारी यांनी बेकायदेशीर शिबिर घेऊन, प्रत्येक कामगाराकडून रुपये पंधराशे घेऊन, शासकीय गृह उपयोगी संच विकत दिले आहेत., असा विक्री करणारा सुरज बोरामनेकर, वैभव रगभले व सहाय्यक कामगार आयुक्त व वाटप करणारे कर्मचारी यांच्यावरती, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे.      

                  आम्ही दिलेल्या आपणास तक्रारीनुसार, आपण सहाय्यक कामगारांना सक्त ताकीद दिलेली होती., बेकायदेशीर शिबिरे व टोकन प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करून, बांधकाम कामगारांना मोफत गृह उपयोगी संच देण्यात यावे., व बेकायदेशीर शिबिरे घेण्यात आलेल्या एजंट वरती व कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. यासंबंधी या पत्राची दखल तात्काळ न घेतल्यास, आपल्या कार्यालयासमोर दि.१७/०३/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता, बेमुदत धरणे बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. असे नमूद करण्यात आले आहे. 

       मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात, विष्णू कारमपुरी (महाराज) अंगद जाधव, बालाजी चराटे, सोहेल शेख, बाळासाहेब हजारे, अशोक कांबळे, स्वाती माने, सुरेश उमप, मिलिंद इंगळे आदींचा समावेश होता.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.