श्रीकृष्ण गुरुकुल चे सामाजिक काम कौतुकास्पद - सुशील कुमार शिंदे निवासी मुलींचे गुरुकुल व श्रीकृष्ण पतसंस्था इमारतीचे उद्घाटन.

  


मोहोळ (अमर पवार ) श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थाने ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना निवासी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच सामाजिक क्षेत्रात संस्था करीत असलेले कार्य कौतुकास्पद आणि अभिमान वाटणारे आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे.

कामती बुद्रुक (ता मोहोळ ) येथे श्रीकृष्ण उद्योग समूह संचलीत निवासी मुलींचे गुरुकुल व श्रीकृष्ण पतसंस्था इमारतीचे उदघाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते 

या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार राजन पाटील संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उमेश पाटील प्रा रोंगे जिल्हा उपनिंबधक किरण गायकवाड एडव्होकेट अर्जुन पाटील काँग्रेस चे शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा दुध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी मानाजी माने बाबासाहेब क्षीरसागर राजेश पवार सुलेमान तांबोळी सरपंच अंजली भोसले बाळासाहेब दुबे माऊली जाधव अशोक भोसले शिवाजीराव अवताडे किसनराव निकम संस्था चे उपाध्यक्ष हनुमंत निकम सचिवा मोनिका आवताडे स्वाती निकम आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम चे प्रास्ताविक प्रा अशोक आवताडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा सुनील गरड यांनी केले. तर आभार प्रा ज्ञानेश्वर शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments