सोलापुर (प्रतिनिधी )
मंगळवेढा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेट देवून केली.
दरम्यान यावेळी पोलीस ठाण्यातील विविध विभागातील दफ्तरांची तपासणी करण्यात आली.
तसेच पोलीस ठाणे रेकॉर्डवरील अवैध धंदे करणार्या इसमांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस अधिक्षकांनी अवैध धंदे बंद करुन वर्तणूकीत सुधारणा करावी अन्यथा तडीपार करण्याचा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्याचे वार्षिक तपासणी होणार असल्याने येथील कर्मचारी गेली दहा ते बारा दिवस झाले विविध गुन्ह्यांचा निपटारा करण्यात रात्रंदिवस मग्न असल्याचे चित्र होते.
दि.१६ जानेवारी २०२५ रोजी जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दुपारी १२ वाजता पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट दिली.
यावेळी त्यांना पोलीस अंमलदारांनी मानवंदना दिली.
पोलीस ठाण्यातील क्राईम विभाग,
गोपनीय विभाग, जप्त मुद्देमाल आदी रेकॉर्डसह अन्य रेकॉर्डची यावेळी तपासणी करण्यात आली.
वार्षिक तपासणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे एक पथक मागील चार दिवसापासून विविध दफ्तरांची तपासणी करण्याकरिता येथे दाखल झाले होते.
दुपारी १२ ते सायंकाळी ५:३० या वेळेत पोलीस अधिक्षकांनी पोलीस अंमलदारांची वैयक्तीक दफ्तर तपासणी करुन उत्कृष्ट काम करणार्या पुरुष व महिला पोलीस अंमलदारांना बक्षिस देवून यावेळी सत्कारही करण्यात आला.
शहर व ग्रामीण भागात अवैध धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात बोलावून अवैध धंदे न करणेबाबत त्यांचे समुपदेशन करुन पोलीस अधिक्षकांनी अवैध धंदे पुन्हा केल्याचे आढळल्यास व त्यांच्यामध्ये सुधारणा न झाल्यास तडीपार करण्याचा गंभीर इशाराही त्यांनी यावेळी अवैध व्यवसायिकांना दिला आहे.
मंगळवेढ्याच्या इतिहासात प्रथमच पोलीस अधिक्षकांनी अवैध व्यवसाय करणार्या प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात बोलावून अवैध धंदे न करणेबाबत सक्त सुचना दिल्याने सुज्ञ नागरिकामधून पोलीस अधिक्षकांचे कौतुक होत आहे
गेली दहा ते बारा दिवस तणावाखाली असलेले पोलीस कर्मचारी वार्षिक तपासणी नंतर तणावमुक्त झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
0 Comments