माळशिरस ( प्रतिनिधी) - या बाबत अधिक माहिती अशी की , मा. तहसिलदार कार्यालय , माळशिरस यांच्याकडे सौ. कल्पना प्रकाश देशपांडे रा.नेवरे ता.माळशिरस जि.सोलापूर यांच्या आई मंदाताई श्रीनिवास देशपांडे रा.पेरले ता.कराड
यांच्या मृत्यु नंतर त्यांच्या नावे असलेल्या बचेरी (ता.माळशिरस) येथील गट नं -474 त्यांनी वारस नोंद होणे बाबत अर्ज दिला होता.
सन 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा झाल्यानंतर, मुलींनाही कौटुंबिक मालमत्तेचा वारसा मिळण्याचा अधिकार मिळाला. वारसाने विहित नमुन्यात व कागद पत्रे सोबत जोडून अर्ज केल्यानंतर त्यावर विशिष्ट मुदतीत काही तरी कारवाई होणे अपेक्षित असताना तहसिल कार्यालय कडून दोन वर्ष होऊन देखील कोणतीही कारवाई केली गेली नाही.या बाबत त्यांनी सतत पाठपुरावा करून हि अधिकाऱ्याकडून प्रतिसाद तर मिळालाच नाही उलट मानसिक व आर्थिक कुचंबणा झाली या सर्व बाबी मुळे ते नैराश्य मध्ये जाऊन त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.
वारस नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांसह त्यांनी तहसील कार्यालय, माळशिरस यांच्याकडे दिनांक 2/2/2023 व 5/7/2023 तसेच 17/10/2023 असे एकूण तीन अर्ज दाखल करुन त्या सोबत ओरिजन कागद पत्रे जोडून
पण प्रशासन अधिकारी यांचेकडून दिलेल्या अर्जाची साधी दखल घेतली गेली नाही. कल्पना व प्रकाश देशपांडे यांनी तहसिल कार्यालयात जाऊन प्रत्येक वेळी त्या अर्जावर काय झालं अशी विचारणा केली असता असे लक्षात आले की कार्यालय सुनावणी घेत तर नाहीच पण आम्ही ज्येष्ठ नागरिक असुन ही आम्हाला वारंवार अपमानित करून पाठवले जात आहे त्यामुळे आम्ही नाईलाजाने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे दिंनाक 6/1/2025 पुन्हा अर्ज दिला असून याबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली आहे व आमच्या
या अर्जाची दखल घेऊन,
दप्तर दिरंगाई कायदा, २००५ हा शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कायद्यानुसार दप्तर दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व आम्हाला योग्य तो मिळवुन द्यावा अन्यथा आम्ही आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे आम्ही दिंनाक 26/1/2025 रोजी माळशिरस तहसिल कार्यालय, माळशिरस यांचे समोर आत्मदहन करणार आहे या सर्व घटनेला सरकारी प्रशासन अधिकारी जबाबदार असतील असे सांगितले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय माळशिरस, माळशिरस पोलिस स्टेशन, अकलूज पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे.
असे त्यांनी सांगितले आहे.त्यांच्या अर्जावर सुनावणी घेऊन त्यांना लवकरात लवकर कारवाई करुन त्यांना योग्य तो न्याय दिला जावा अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
0 Comments