भटक्या जमातीवर होणारे अन्याय रोखा अन्यथा आंदोलन संजय कदम यांचा केंद्र सरकार ला इशारा.



सोलापूर (प्रतिनिधी ) केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालय, केंद्रीय विमुक्त घुमंतू अर्धघुमंतू विकास एवं कल्याण बोर्ड दिल्ली भारत सरकार यांना भारत देशात होणार्‍या विमुक्त जाती भटक्या विमुक्त जमाती समाजावर होणार्‍या अन्याय अत्याचार संदर्भात निवेदन दिले असून  खेड राजगुरूनगर येथे मकवाने परिवारातील 2 चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली, आणि भारत देशात विमुक्त जाती भटक्या जमाती समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, त्यामुळे केंद्रीय स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला ॲट्रॉसिटी संरक्षण कायद्यासारखा संरक्षण कायदा समाजासाठी आणावा त्यासाठी केंद्र सरकारने एक समितीने नेमावी आणि देशभरात होणाऱ्या भटके विमुक्तच्या अन्याया संदर्भातची अहवाल करावा व विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी संरक्षण कायदा आणावा तसेच पडित कुटुंबाला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून  केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय विमुक्त घुमंतू अर्धघुमंतू विकास एवं कल्याण बोर्ड दिल्ली भारत सरकार कल्याण बोर्ड यांच्या डायरेक्टर आणि CEO मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले  पीडित कुटुंबाला न्याय भेटावा, समाजाला न्याय भेटावा आरोपीला फाशी मिळावी, यासंदर्भात  संजय कदम यांनी निवेदन दिले आहे केंद्र सरकारने लवकर तोडगा नाही काढला तर समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments