प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकारांच्या वतीने मानाची टोपी पुष्पहार पुष्पगुछ शाल व लेखणी देऊन सत्कार.




सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवस पत्रकार दिनी म्हणजेच 6 जानेवारी रोजी असतो महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या व पत्रकारांसाठी कायम संघर्ष करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवस पत्रकार दिनी असल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारांचा लढा उभा करून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.



 पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी गेल्या आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन महाराष्ट्र राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण इत्यादी विषयासह महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी आपलं उभ आयुष्य खर्ची घातले असून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नासाठी चळवळ उभी केली आहे 6 जानेवारी पत्रकार दिनी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवस असतो सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा जिल्हा परिषद येथे मानाची टोपी पुष्पहार पुष्पगुछ व लेखणी व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.




 यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक सादिक शेख दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद सिद्धाराम नंदर्गी अप्पासाहेब लंगोटे लतीफ नदाफ अशपाक शेख मिलिंद (नाना ) प्रक्षाळे मुस्ताक शेतसंदी अस्लम नदाफ गीरमला गुरव वैजिनाथ बिराजदार नागेश पासकंटी अजय प्रक्षाळे नितीन करजोळे अशोक ढोणे दशरथ काळे ऋषिकेश ढेरे पप्पू गायकवाड बालाजी चिटमल आदम मुलाणी आबा तळभंडारे इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments