कवठे महांकाळ खून खटल्याच्या गुन्ह्यात ७ पैकी ५ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांनी केला होता तपास

 


यात थोडक्यात हकीकत अशी की, कवठे महांकाळ पोलीस ठाणे हद्दीतील अग्रण,धुळगाव या गावात दिनांक 01/12/2017 रोजी यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त तमाशा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी यातील 7 आरोपींनी गोंधळ घातला होता, म्हणून फिर्यादी यांच्या मुलाने कमिटी कडे तक्रार केली होती. ही तक्रार केल्याचा राग मनात धरून गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलास अडवून गुप्ती,कुकरी व काठ्या या हत्यारांनी वार करून जीवे ठार मारले होते.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा,सांगली यांनी पूर्ण करून गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मे.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या तपासामध्ये,पोलीस कर्मचारी सागर पाटील व पवार यांनी मदत केली होती.

या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालय सांगली येथे झाली असून मा.न्यायालयाने दिनांक 07/01/2025 रोजी सदर खटल्याचा निकाल जाहीर केला आहे. त्यामधे 7 पैकी 5 आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा जाहीर केली आहे. उर्वरित 2 आरोपींपैकी 1 आरोपी मयत असून 1 आरोपीस संशयाचा फायदा मिळाल्याने निर्दोष सोडले आहे.

या खटल्याच्या कामकाजात कोर्ट पैरवी म्हणून मपोह/ 1249 वंदना मिसाळ आणि मपोशी सुप्रिया भोसले यांनी काम पाहिले आहे. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने जिल्हा सरकारी वकील श्री. देशमुख श्री.भोकरे यांनी काम पाहिले आहे

Post a Comment

0 Comments