सोलापुरातील ४२३ दवाखान्यांची होणार तपासणी उपसंचालकांचे महापालिकेला आदेश एक बेड असले तरी परवाना बंधनकारक



सोलापूर (प्रतिनिधी) महापालिकेची परवानगी घेऊन सुरू असलेल्या व शहरात एका गाळ्यात चालविले जाणाऱ्या ओपीडी दवाखान्यांचीही तपासणी करावी. बोगस डॉक्टरांवर नियंत्रण आणण्यासाठी गोळ्या-औषध देणाऱ्या ओपीडी दवाखान्यात एक बेड असले तरी त्यांना महापालिकेचा परवाना बंधनकारक करावा असे आदेश देण्यात आले आहेत.


पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियमांतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटल तपासणी करण्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. तब्बल तीन तास ही बैठक चालली असून शासनाने आरोग्य विभागावर लक्ष केंद्रित केले आहे 


 या बैठकीत महापालिका आरोग्य विभागाला अनेक सूचना दिल्या आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने नर्सिंग अधिनियमांतर्गत चालणाऱ्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या आजारासाठी आकारले जाणाऱ्या बिलाचे माहिती फलक, सरकारी योजनांच्या सुविधांचे माहिती फलक, हॉस्पिटलमधील सुविधा, डॉक्टरांची

संख्या व त्यांची शैक्षणिक पात्रता, वेळा आणि इतर कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता. आपत्कालीन व्यवस्थेसाठीची अग्निशमन यंत्रणा, बायोमेडिकल वेस्ट सिस्टिम, हॉस्पिटलची स्वच्छता आदींची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.


त्याचबरोबर ठिकाणी गोळ्या शहरात बहुतांश औषध देण्यासाठी

छोट्याशा गाळ्यात दोन बेड या दवाखाने सुरू असतात काही ठिकाणी बोगस डॉक्टरांचे दवाखाने सुरु असतात. अशा दवाखान्यांचा शोध घेऊन त्यांना महापालिकेचा परवाना बंधनकारक करा. त्यांची शैक्षणिक पात्रता तपासा अशा सक्त सूचना या बैठकीत आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. मात्र शहरात नोंदणीकृत ४२३ तर नोंदणी नसलेल्या हॉस्पिटलची संख्या मोठी असू शकते या हॉस्पिटलच्या तपासणी साठी मनुष्यबळाची आवश्यकता त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणीही यावेळी महापालिकेने केली आहे हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या उपचारपद्धती नागरिकांची होणारी आर्थिक लूट शासकीय योजना, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट हे विषय गंभीर आहेत.

------------------------------------------------------------

सोमवारी दुपारी आरोग्य उपसंचालकांनी बैठक घेतली शहरातील खासगी हॉस्पिटल गाळ्यामध्ये चालणाऱ्या छोटया दवाखान्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत दर महिन्याला तपासणी अहवाल शासनाला द्यायचा आहे तपासणी करताना अडथळा केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत या तपासणीसाठी स्वतंत्र पथक नियुक्त करून मोहीम हाती घ्यावी लागणार आहे लवकरच मोहीम हाती घेण्यात येईल 

डॉ राखी माने 

आरोग्य अधिकारी महापालिका सोलापूर.

Post a Comment

0 Comments