ॲड.दिलीप जगताप यांची दैनिक लोकशाही मतदार च्या प्रमुख कायदेशीर सल्लागार पदी निवड




सोलापूर (प्रतिनिधी)- दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक लोकशाही मतदार जे गेल्या 2 वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध लोकप्रिय झाले आहे. वंचित पिडीत अन्यायग्रस्त घटकांना आपल्या आगळ्यावेगळ्या लेखणीच्या मध्यामधून न्याय मिळवून देण्याचे काम केले असून परखड लेखणी सडेतोड लेखन करणारे वृत्तपत्र अशी ओळख निर्माण केले आहे.कायद्याचे महत्त्व लोकांना कळावे माहिती व्हावी जनता आपल्या हक्क अधिकार बाबत ज्ञात असावे यासाठी दैनिक लोकशाही मतदार चे मुख्य संपादक अक्षय बबलाद यांच्या उपस्थितीत दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राचे कायदेशीर प्रमुख सल्लागार म्हणून ॲड.दिलीप जगताप यांची नियुक्ती करण्यात आले आहे.सदरील नियुक्ती पत्रकार सुरक्षा समितीच्या पत्रकार दीन कार्यक्रमात करण्यात आले असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुरक्षा समिती चे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष अंबादास शिंदे जेष्ठ विधीज्ञ ॲड.संजीव सदाफुले निवृत्त पोलिस अधिकारी अरुण कदम दैनिक लोकशाही मतदार चे निवासी संपादक व जेष्ठ पत्रकार डॉ.किर्तीपाल गायकवाड कामगार नेते विष्णू कारमपुरी आदी सह इतर पत्रकार सुरक्षा समिती चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकशाही मतदारच्या माध्यामातून जनतेच्या कायदेशीर ज्ञानात शक्य तेवढे भर टाकेन - ॲड. दिलीप जगताप


 देशभरात अनेक घटना घडत असतात छोट्या पासून मोठ्या पर्यंत, मोठ मोठ्या घटना दिसून येतात तर छोट्या घटना हे निदर्शनास येत नाही अश्यावेळी एखादी घटना घडल्यास सर्वसामान्य माणसांना काय करावे हे कायद्याचे ज्ञान अपूरे असल्याने मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण होतो. याला कुठे तरी चाप बसावे जनतेला कायद्यांचे ज्ञान असावे यासाठी दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राच्या प्रमुख सल्लागार म्हणून माझी निवड करण्यात आले असून या वृत्तपत्राच्या मध्यामातून शक्य तेवढे कायदेशीर ज्ञान कायदेशीर मार्गदर्शन करण्याचे काम करेन जेणेकरून कोणत्याही सर्वसामान्य माणसाला आपल्या हक्क अधिकार बाबत माहिती असावी असे सांगत नियुक्ती प्रसंगी ॲड.दिलीप जगताप यांनी भावना व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments