सोलापूर (प्रतिनिधी )
गेली बारा वर्षांपासून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र अविरत पणे सुरु असून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे संपादक यशवंत पवार यांनी नेहमीच समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या व्यथा वेदना साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या माध्यमातून सविस्तर पणे मांडून आपली प्रामाणिक पत्रकारिता जपली असून निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड लेखणीच्या माध्यमातून साप्ताहिक कार्यसम्राट ने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे साप्ताहिक कार्यसम्राट ने आजवर समाजाला दिशा देण्याचं काम करत असल्याचे प्रतिपादन जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केलं आहे
साप्ताहिक कार्यसम्राट दिवाळी अंकाचे प्रकाशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उदयसिंह पाटील यांच्या हस्ते जेलरोड पोलीस ठाणे येथे थाटात करण्यात आले
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उदय सिंह पाटील बोलत होते
समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून जेष्ठ संपादक यशवंत पवार हे पत्रकारिता करत असून त्यांनी आजपर्यंत लेखणीतून परखड भूमिका मांडत आपलं वृत्तपत्र सुरु ठेवल्याचे सांगत साप्ताहिक कार्यसम्राट च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे यावेळी सा कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार राजू वग्गू लक्ष्मण सुरवसे अरुण सिडगिद्दी रमेश दग्गारी व्यंकटेश सुंचू गणेश निंबाळकर कलीम पटेल इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
