अरविंद माने यांच्या नावाची हल्ली प्रिंट मीडिया इलोक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया सह मुक्त पत्रकारांमध्ये मोठया प्रमाणात चर्चा सुरु आहे सोलापूर शहरातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारा खमका अधिकारी म्हणून युवा पत्रकारांमध्ये वेगळीचं क्रेझ निर्माण झालेली दिसत आहे गुन्हेगारीचे समूळ उच्छाटन अन बिमोड करण्यासाठी प्राणाची बाजी पणाला लावणारा निरपेक्ष निर्भीड अन कणखर दिलेर पोलीस अधिकारी म्हणून अरविंद माने यांची पोलीस दलासह संपूर्ण सोलापूर शहरात आगळी वेगळी ओळख आहे
सज्जनांचा सखा तर गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजले जाणारे त्याच बरोबर सर्वसामान्य माणसाला कायद्याच्या चौकटीत मार्गदर्शन करून योग्य तो सल्ला देऊन न्याय देण्याची भूमिका पार पाडणारे सोलापूर शहरातील चोरी जबरी चोरी ड्रग खूना सारख्या गंभीर गुन्ह्यांची अतिशय कौशल्यपूर्ण उकल करून जेलची हवा खाण्यास भाग पाडणारे सोलापूर शहरातील पत्रकारांना आपुलकीने वागवणारे प्रेमाने व मायेने विचारपूस करणारे पत्रकारांच्या हक्काचा व जिवाभावाचा अधिकारी म्हणून पोलीस दलातील शांत संयमी प्रसंगी कठोर कणखर रुबाबदार देखणं अभ्यासूअन दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजेच अरविंद माने साहेब
कायद्याच्या अभ्यासाबरोबरच पत्रकारांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे त्याच बरोबर
सोलापूर शहराच्या सुरक्षिततेसाठी, गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सतत झटणारे शहर गुन्हे शाखेचे सिंघम म्हणून पत्रकारांना परिचित असलेले कर्तव्य, निडरता आणि सेवाभाव यांचा उत्तम संगम असलेल्या अरविंद माने साहेबांनी पोलिसी कार्यात जे योगदान दिलं आहे, ते आज सोलापुरकरांसाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.
*कर्तव्यनिष्ठ कडक शिस्त अन कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी*
अरविंद माने सरांचा पोलिसी प्रवास हा शिस्त, प्रामाणिकपणा आणि तात्काळ निर्णयक्षमता यांचा उत्तम नमुना आहे. मोठमोठे गुन्हे, गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई, गंभीर प्रकरणांतील जलद उकल – हे त्यांच्या कारकिर्दीतील ठळक पैलू आहेत. त्यांनी नेहमीच “कायदा सर्वोच्च” या तत्त्वाला प्राधान्य दिले असून, कोणत्याही दबावाला न जुमानता काम केले आहे.
*शहर गुन्हे शाखेला लाभलेलं रुबाबदार देखणं अन मजबूत दमदार नेतृत्व*
अरविंद माने यांनी कायद्याचे पालन करत सामान्य जनतेशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर भर दिला आहे लोकांच्या समस्या ऐकणे त्यावर योग्य तो तोडगा काढणे यामुळे सोलापुरातील अनेकांसाठी ते लोकप्रिय ठरले आहे.
*कर्तव्यनिष्ठेला प्रथम प्राधान्य*
श्री अरविंद माने हे सोलापुरातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा हे पोलिस दलासाठी आदर्शवत आहेत. अरविंद माने यांच्या नुसत्या तिरकस अन भेदक नजरेने अनेक भल्याभल्या गुन्हेगारांची केवळ पाचावर धारणचं नव्हे तर गाळण देखील उडते शहरातील भाईगिरी करणाऱ्या अनेक बड्या गुन्हेगारांना सोलापूर शहर सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीच
गुन्हेगार कितीही मोठा अथवा शागिर्द असू द्या अरविंद माने यांच्या अचूक नजरेने हेरला म्हणून समजा, अरविंद माने यांनी शहर गुन्हे शाखेचा पदभार घेतल्या पासून अनेक बडे व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल अतिशय नियोजनबद्ध व अभ्यासपूर्ण केली असून अरविंद माने यांचे नेटवर्किंग जाळे देखील मोठया प्रमाणात असल्याने पाहिजे असलेला बडा गुन्हेगार जास्त दिवस बाहेर राहूच शकत नाही. शहर गुन्हे शाखेला लाभलेला परिस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अरविंद माने यांच्या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करताना पत्रकारांच्या लेखणीला देखील कधीकधी शब्द अपुरे पडतात. अरविंद माने यांच्या बाबतीत नेमकं काय लिहावं? किती लिहावं अन थांबावं कुठं ? असा प्रश्न आमच्या सारख्या जेष्ठ पत्रकारांना देखील अधून मधून पडतो पोलीस दलाची आण बाण अन शान वाढवण्यासाठी कार्यसम्राट न्यूज चे नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आहे. धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे लेखणीतून कौतुक करताना आम्हाला देखील मनस्वी समाधान लाभते
आमच्या सारख्या जेष्ठ पत्रकारांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या निरपेक्ष निडर निर्भीड कर्तव्यनिष्ठ अन कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी अरविंद माने यांना दिवाळी निमित्त कार्यसम्राट न्यूज वतीने शुभेच्छा 💐💐💐💐
आपलाच
संपादक
*यशवंत पवार*✒️


