सोलापूर (प्रतिनिधी ) पंढरपूर येथील साप्ताहिक ठीणगी दिवाळी अंकाचे सोलापूर येथे थाटात प्रकाशन करण्यात आले यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून ठीणगी चे संपादक रामचंद्र सरवदे यांनी समाजातील वंचित पिढीत अत्याचार ग्रस्त अन्यायग्रस्त लोकांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी आपल्या लोकप्रिय साप्ताहिक ठिणगी वृत्तपत्रातून सातत्याने प्रशासन दरबारात आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे वंचित घटकाला न्याय देण्यासाठी प्रभावी लेखणीची गरज असून निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड लेखणी वंचित पिढीत घटकाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकत असल्याचे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रकाशन वेळी केलं असून सा ठिणगी वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पुढे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर येथून साप्ताहिक ठिणगी वृत्त पत्र प्रकाशित होत असून सा ठिणगी वृत्त पत्राने पंढरपूर तालुक्यातील जनतेचे प्रश्न सरकारी दरबारात मांडून आपली निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड पत्रकारिता जपली आहे साप्ताहिक ठिणगी वृत्तपत्राने पंढरपूर तालुका सह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीचा अचूक वेध घेऊन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून समाजाचा आरसा म्हणून साप्ताहिक ठिणगी काम करत असून साप्ताहिक ठिणगी च्या बातमीमुळे अनेकांना न्याय मिळाला आहे
या प्रसंगी साप्ताहिक ठिणगीचे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ राम हुंडारे कार्याध्यक्ष अतुल भडंगे संघटक अरुण सिडगिद्दी सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव रमेश दग्गारी समन्वयक लक्ष्मण सुरवसे संघटक गणेश निंबाळकर दत्तात्रय बनसोडे विक्रम आठवले श्रीनिवास पेद्दी सुधीर डोळे इत्यादी उपस्थित होते.
